चारोळ्या (Charolya)
मला आवडतो पाऊस,गुलमोहराला फुलावणारा,
अन, तेवढ्याच मायेने,बाभळीला हि झुलवणारा.
जसे अतूट नाते असते पाऊस आणि छत्रीचे,
तसेच काही नाते तुज माझ्या मैत्रीचे,पाऊस येतो आणि जातोसाथ छत्रीची असू दे असेच तो सांगतो.
कातर वेळचा गार वारा,
तुझी स्मृती घेऊन भेटतो,
मिट्ट काळोख येता गारवा,
पाऊस अलगद मनात दाटतो.
पाऊस कधीचा पडतो,झाडाची हलती पाने,हलकेच मला जाग आली,दु:खाच्या मंद स्वराने.
ढग येतात पण पाऊस पडत नाही,आठवणी येतात पण चेहरा दिसत नाही,काय मी बोलू तुला पुढे गाय मागे वासरू,संग प्रिये मी तुला कसे विसरू.